SSC HSC Result 2023: दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; इथे पहा निकाल

Maharashtra SSC HSC Result 2023: इयत्ता  दहावी बारावीच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र  (इयत्ता दहावी) पुरवणी लेखी परीक्षा दिनांक 18 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) ची पुरवणी लेखी परीक्षा दिनांक 18 जुलै 2023 ते 8 ऑगस्ट 2023 व माहिती तंत्रज्ञान सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाईन परीक्षा 9 व 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. दरम्यान अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या विषयाची परीक्षा ही नियोजित वेळेप्रमाणे घेण्यात आली.


शासकीय योजनाच्या माहितीसाठी
Whatspp Group 
जॉईन करा आणि माहिती मिळवा



SSC HSC Result 2023: दहावी  बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; इथे पहा निकाल 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल खालील संकेतस्थळावर सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील सदर माहितीची प्रिंट सुद्धा घेता  येईल.


निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

www.mahresult.nic.in


HSC SSC Exam Result Verification

SSC HSC Result 2023 नंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून इयत्ता दहावीसाठी व इयत्ता बारावी साठी स्वतः किंवा शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय मार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गुणपडताळणी व पुनर्मुल्यांकन



यासाठी आवश्यक अटी व शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट ते 07 सप्टेंबर 2023 पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/UPI/नेट बँकिंग द्वारे शुल्क भरता येईल.

11वीच्या विद्यार्थ्यांना 72000 शिष्यवृत्ती

नवोदय विद्यालय प्रवेश 2024

दहावी पासवर 2000 जागा

9 वी ते 12वीसाठी सारथी शिष्यवृत्ती


HSC-SSC Exam Result 2023

जुलै ऑगस्ट 2023 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तर पत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत  मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

HSC-SSC Board Exam 2024

फेब्रुवारी मार्च 2023 24 मधील माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हायचे आहे अशा नियमित पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व आयटीआय द्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.


HSC Bord Exam 2024

फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादनूक सुधारण्यासाठी श्रेणी गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षेत पुनश्य प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली असून सदर विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षा ही अंतिम संधी असेल याची नोंद घ्यावी त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही परीक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही.



Class Improvement Scheme

जुलै ऑगस्ट 2023 च्या परीक्षेमध्ये सर्व विषयासह प्रथम प्रविष्ट होऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादनूक सुधारण्यासाठी श्रेणी गुण सुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी तरतुदींच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील.

Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने