5th 8th scholarship exam: दरवर्षी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये scholarship exam परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे. दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी 9 ते 10 लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र होणे, शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल वाढविणे, त्याचबरोबर विद्यार्थी निश्चित करून त्यांचे आवेदन पत्र भरणे तसेच त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे यासाठी शाळांच्या नियोजन करण्यासाठी 9 मे 2023 रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून शिष्यवृत्ती दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. पहा
![]() |
5th 8th Scholarship Exam |
5th 8th scholarship exam: ५वी ८वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2024
शासनमान्य शाळांमधून सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी तसेच इयत्ता आठवी मध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी नमूद अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी 5th 8th Scholarship Exam घेतली जाते.
Scholarship Exam Form Date
परीक्षा परिषदेच्या वतीने दिनांक 9 मे 2023 रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता सन 2024 च्या परीक्षेसाठी शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांची निवड करून आवेदन पत्र भरून घेण्याची कार्यवाही 01 जुलै 2023 पासून सुरू करण्याचे परिषदेचे नियोजन होते. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी निश्चित करून त्याप्रमाणे सदर परीक्षेची पूर्वतयारी करून घेता येईल काही वेळा पात्रतेबाबत असणारे आवश्यक गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त न केल्यामुळे अडचणी निर्माण होतात त्या अनुषंगाने या परिपत्रकानुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यास सुरू होणार आहेत.
अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या खालील संकेतस्थळावर भेट देऊ शकता
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- किंवा महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे.
- विद्यार्थी शासनमान्य शासन मान्य शासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयं अर्थसाहित शाळेत इयत्ता पाचवी किंवा आठवी मध्ये शिकत असावा.
शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप
- इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी 150 प्रश्नांची परीक्षा होईल.
- प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहेत त्यानुसार 300 गुणांची परीक्ष होईल.
- प्रथम भाषेस 25 प्रश्नांसाठी 50 गुण तर गणित विषयाचे 50 प्रश्नांसाठी 100 गुणांचे एका सत्रात परीक्षा होते.
- दुसऱ्या सत्रामध्ये तृतीय भाषा 25 प्रश्नांसाठी 50 गुण तर बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्नांसाठी 100 गुणांची परीक्षा होते.
- सर्व प्रश्न हे वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे असतात.
- प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतात.
- इयत्ता 8 वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 20% प्रश्न 2 पर्याय अचूक असतात ते पर्याय निवडणे आवश्यक असते.
विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे निकष
शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
राज्यामध्ये 5 ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन शाळा आहेत. त्यामध्ये सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती आणि यवतमाळ यांचा समावेश होतो. त्यासाठी खालील अटी व शर्ती पूर्ण करणारा असावा.
- इयत्ता 5वी मध्ये शिकत असणारा असावा.
- शाळा ग्रामीण भागातील असावी.
- फक्त मुलांना प्रवेश
- फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.
- ऑनलाइन आवेदनपत्र भरतांना शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय? या पर्यायासमोर होय हा पर्याय निवडावा.
आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा
सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा
- इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेला असावा
- फक्त मुलगा असावा
- अनुसूचित जमातीतील असावा
- शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा
- फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा
- ऑनलाईन आवेदन पत्र भरताना आदिवासी विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे काय या पर्याय समोर होय असे लिहावे.
विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा.
विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन हे कमळेवाडी पोस्ट शिरूर तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
- इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेला असावा.
- आश्रम शाळेतील विद्यार्थी असावा.
- फक्त मराठी सेमी मराठी माध्यमातील असावा.
- ऑनलाइन आवेदन पत्र भरताना विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन मध्ये प्रवेश हवा आहे काय या पर्याय समोर पर्याय म्हणून लिहिणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय इयत्ता पाचवीसाठी 11 वर्ष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 15 वर्ष वयापर्यंत सूट देण्यात येते. इयत्ता आठवीसाठी 14 वर्ष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 18 वर्ष वयापर्यंत सूट देण्यात येते.
शिष्यवृत्ती परीक्षेचे माध्यम
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाते मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु आणि कन्नड या सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमांची सुद्धा सहा पर्याय उपलब्ध असतात सेमीमध्ये विद्यार्थी त्याच्या मूळ भाषेसह इंग्रजी भाषेमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध होतात.
शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क
- इयत्ता पचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षासाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना 200 रुपये तर मागास /दिव्यांग विद्यार्थ्यांना 125 रुपये फील आकारली जाते. ही फिस परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क एकत्रित करून घेतली जाते. विलंब व अतिविलंबाची शुल्क वेगळी आकारली जाते.
- या शिवाय शाळेच्या वतीने शाळा शुल्क 200 रुपये आकारण्यात येतात.
- महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B ,C, D प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे.
- सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे.
- उर्वरित SBC, OBC आणि ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागते.
BARTI Scholarship for School Children
मा. महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (BARTI) पुणे या कार्यालयामार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसुचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांना 2014 पासून देण्यात येते.
त्यानुसार इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील कटऑफ लिस्टच्या खालिल पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मा. महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (BARTI) पुणे या कार्यालयाकडे मागणीनुसार पुरविण्यात येतात.
FAQ वारंवार विचारली जाणारी प्रश्न
- होय, विद्यार्थी शासनमान्य शासन मान्य शासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयं अर्थसाहित शाळेत इयत्ता पाचवी किंवा आठवी मध्ये शिकत असावा.
प्रश्न - पर राज्यातील विद्यार्थ्यांना 5th 8th Scholarship Exam देता येते का?
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. किंवा महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असावे.
- होय, दिव्यांग विद्यार्थी 5th 8th Scholarship Exam देऊ शकतात त्यांना वयाची सवलत असते.
- नाही, 5th 8th Scholarship Exam ही ऑफलाईन आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ होते.
अधिक माहितीसाठी वरील संकेस्थळावर भेट द्यावी.