MSBW Recruitment 2023: वक्फ बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 60 जागांवर भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा.

Waqf Board Recruitment: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागेवरील भरती करिता नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार Maharashtra State Board of Waqfs औरंगाबाद येथे विविध पदे भरण्यात येणार आहेत. MSBW Recruitment 2023 च्या वतीने पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. Online Form Link व जाहिरात विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे..


जॉईन करा

MSBW Recruitment 2023


MSBW Recruitment 2023: वक्फ बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 60 जागांवर भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अधिनस्त विविध कार्यालयाच्या आस्थापनेवर जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधी सहाय्यक ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. संवर्गातील भरावयाच्या रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे देण्यात आला आहे.

आरोग्य विभाग गट क 6939 जागा

आरोग्य विभाग गट ड 4010 जागा

8वी 10वी पास साठी 2800 जागा

BMC मध्ये 226 पदांची भरती


MSBW Post wise Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
जिल्हा वक्फ अधिकारी25
कनिष्ठ लिपिक31
लघु टंकलेखक01
कनिष्ठ अभियंता01
विधी सहायक02
एकूण60


Important Dates for MSBW Recruitment

MSBW Recruitment 2023 साठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून दिनांक 4 सप्टेंबर 2023 या कालावधीत अर्ज करावा. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. त्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाने प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Payment For MSBW Recruitment


पदाचे नाववेतनश्रेणी
जिल्हा वक्फ अधिकारीवेतनश्रेणी 9300-34800+ग्रेड पे 4200 (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी लागू)
कनिष्ठ लिपिकवेतनश्रेणी 5200-20200+ग्रेड पे 1900 (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी लागू)
लघु टंकलेखकवेतनश्रेणी 9300-34800+ग्रेड पे 4300 (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी लागू)
कनिष्ठ अभियंतावेतनश्रेणी 9300-34800+ग्रेड पे 4300 (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी लागू)
विधी सहायकवेतनश्रेणी 9300-34800+ग्रेड पे 4200 (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी लागू)

Educational Qualification For MSBW Recruitment

जिल्हा वक्फ अधिकारी / अधीक्षक

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असावा.

कनिष्ठ लिपिक

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असलेली पदवी
  • मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40 प्रमाणपत्र

लघु टंकलेखक 

  • दहावी उत्तीर्ण असावा
  • लघु टंकलेखन 100 शब्द प्रतिमिनीट
  • मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40 प्रमाणपत्र

कनिष्ठ अभियंता

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी/ पदव्युत्तर पदवी
  • किमान 2 वर्षाचा अनुभव

विधी सहायक

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विषयी शाखेतील पदवी
  • किमान 3 वर्षे  वकिलीचा अनुभव
  • राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागात विधी सहायक पदावरील कामाचा अनुभव.

Online Form Link for MSBW Recruitment 2023

जाहिरात पहा

ऑनलाईन फॉर्म


MSBW Recruitment 2023  वक्फ बोर्डाच्या आस्थापनेवर भरल्या जाणाऱ्या वरील रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया, परीक्षेचा अभ्यासक्रम, वयाची अट, इत्यादी सर्व माहितीसाठी वरील जाहिरात डाउनलोड करून पाहावे.

Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने