ZP Recruitment Educational Qualification 2023: जिल्हा परिषद भरती पदनिहाय शैक्षणिक पात्रता २०२३

ZP Recruitment Educational Qualification 2023 राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये भारती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीमध्ये विविध पदांची रिक्त पदे. भरली जाणार आहेत. 2023 मधील सर्वात मोठी भारती म्हणून ZP Recruitment कडे पहिले जात आहे. Zilla Parishad Bharti  2023 मध्ये भरल्या जाणाऱ्या विविध पदांची Educational Qualification   खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 


जॉईन करा


ZP Recruitment Educational Qualification 2023
ZP Recruitment Educational Qualification 2023

ZP Recruitment Educational Qualification 2023:  जिल्हा परिषद भरती पदनिहाय शैक्षणिक पात्रता २०२३

ZP Recruitment Educational Qualification 2023

ZP Bharti आरोग्य पर्यवेक्षक 

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी 
  • ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा

ZP Bharti आरोग्य सेवक (पुरुष) 40% 

  • विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्णअसावा.
  • ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा
  •  पूर्ण नसल्यास नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.

ZP Bharti आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 

  • विज्ञान विषयासह दहावी उत्तीर्णअसावा.
  • राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन 20 दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य 
  • ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
  • पूर्ण नसल्यास नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.

ZP Bharti आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)

  • अर्हताप्राप्त साह्यकारी प्रसाविका.
  • महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी असावी.

ZP Bharti औषध निर्माण अधिकारी 

  • औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका 
  • औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते

अमरावती जिल्हा परिषद भरती 653 जागा


ZP Bharti कंत्राटी ग्रामसेवक

  • किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समतुल्य अर्हता परीक्षेत60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा 
  • शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा 
  • शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा 
  • माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा

  • कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा 
  • कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा 
  • समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवार
  • संगणक हातळणी वापराबाबत  परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारक

ZP Bharti कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा 

  • स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका तीन वर्षाचा पाठक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार



ZP Bharti कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 

  • यंत्र अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षांचा पाठयक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार

ZP Bharti कनिष्ठ आरेखक

  • दहावी उतीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक
  • शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा क्रमशस्वीरित्या पूर्ण केला असावा

ZP Bharti कनिष्ठ यांत्रिक 

  • तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदत्ताचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि
  • रूळ मार्ग किंवा वाफेवर किवा तेलावर चालणारे (रोडड रोलर दुरुस्त) अनुभव

ZP Bharti कनिष्ठ लेखाधिकारी

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
  • किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव 
  • लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षन हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना प्राधान्य
  •  किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी

ZP Bharti कनिष्ठ सहाय्यक 

  • दहावी अथवा समतुल्य परीक्षा उतीर्ण असावा
  • मराठी टायपिंग परीक्षा उतीर्ण
  • इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

ZP Bharti कनिष्ठ सहाय्यक लेखा 

  • दहावी अथवा समतुल्य परीक्षा उतीर्ण असावा.

  • मराठी टायपिंग परीक्षा उतीर्ण
  • इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य
  • लेखाविषयक कामकाजाचा पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

ZP Bharti जोडारी 

  • चौथी उत्तीर्ण आणि किमान दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव
  •  शासकीय तंत्र शाळेतून  विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम उत्तीर्ण 

ZP Bharti मुख्य सेविका / पर्यवेक्षिका 

संविधिक विद्यापीठाची, (विशेषत: समाजशास्त्र / गृहविज्ञान / शिक्षण / बालविकास पोषण)  या विषयातील स्नातक ही पदवी उतीर्ण असावी.

ZP Bharti पशुधन पर्यवेक्षक 

  • संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा
  • पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी), किंवा महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले अभ्यासक्रम 
  • संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

ZP Bharti प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  • विज्ञान विषयामध्ये पदवी (भौतीकशास्त्र /रसायनशास्त्र /जीवशास्त्र / वनस्पतीशास्त्र / प्राणीशास्त्र / सुक्ष्म जीवशास्त्र)
  • हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

ZP Bharti यांत्रिक

  • दहावी अथवा समतुल्य अर्हता असावी.
  • ITIमधील यांत्रिक विद्युत अथवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे. 
  • ऑटोमोबाईल व न्यूमॅटिक मशीनच्या देखभाली व दुरुस्तीचा 1 वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. 
  • जड वाहन चालविण्याचा परवाना धारक असावा. 

ZP Bharti रिगमन (दोरखंडवाला)

  • दहावी अथवा समतुल्य अर्हता असावी.
  • जड वाहन चालविण्याचा परवाना धारक असावा. 
  • विंधन यंत्राद्वारे खुदाईचा 2 वर्षापेक्षा अनुभव 

ZP Bharti वरिष्ठ सहाय्यक  

  • संवैधानिक विद्यापीठाची पदवी उतीर्ण

ZP Bharti वरिष्ठ सहाय्यक लेखा 

  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 
  • वाणिज्य शाखेतील पदवी धारकास प्राधान्य
  • तीन वर्ष प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

ZP Bharti विस्तार अधिकारी (कृषि) 

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता 
  • कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असणार्यांना प्राधान्य


ZP Bharti विस्तार अधिकारी (शिक्षण), (वर्ग3 श्रेणी 2) 

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण 
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी  किमान 50% गुणांसह उत्तीर्ण 
  • शासनमान्य शाळेतील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तीक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापन किंवा प्रशासनाचा अनुभव

ZP Bharti विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 

  • मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह  पदवी
  • नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

ZP Bharti स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे)  

  • दहावी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण 
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण 

परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम पहा


Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने