Mahajyoti Competative Exam Timetable: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्थापन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था [महाज्योती]ची स्थापना करण्यात आली असून याचे नागपूर येथे मुख्य कार्यालय आहे. Mahajyoti या संस्थेमार्फत विविध योजना / प्रकल्प राबविण्यात येतात. त्याच बरोबर पात्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन / शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाज्योतीकडून 2023-24 मध्ये दिल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे नुकतेच Exam Timetable जाहीर करण्यात आले आहे त्याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
![]() |
Mahajyoti Exam Timetable |
विद्यार्थ्यानो तयारीला लागा!! महाज्योतीकडून विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर Mahajyoti Exam Timetable
महाराष्ट्र राज्यातील भटक्या जाती - विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, बँकिंग, पोलीस भरती, मिलिटरी भरती, इत्यादी परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते.
Mahajyoti च्या या सर्व योजनेअंतर्गत प्रशिक्षणाकरिता MAHAJYOTI च्या वतीने विद्यार्थ्यांकडून Online Form मागविण्यात आलेले होते. त्यानुसार कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर जे विद्यार्थी छाननी परीक्षेकरिता पात्र असेल त्या विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेण्याकरिता Mahajyoti Exam Timetable जाहीर करण्यात आले आहे.
Mahajyoti Exam Timetable
महाज्योतीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे.
परीक्षा | हॉलतिकीट | परीक्षा |
---|---|---|
मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण | 30.6.2023 | 9.7.2023 |
UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण | 7.7.2023 | 16.7.2023 |
MPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षण | 21.7.2023 | 30.7.2023 |
MPSC Group B&C परीक्षा पूर्व प्रशिक्षण | 3.8.2023 | 13.8.2023 |
MBA-CAT/CMAT-CET | 16.8.2023 | 27.8.2023 |
परीक्षेचे स्वरूप : वरील सर्व परीक्षा ह्या संगणकाच्या माध्यमातून ऑनलाईन [Computer Based Test] घेण्यात येणार असून बहुपर्यायी असणार आहेत.
उमेदवाराना महात्वाची सूचना
चाळणी परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असेल. त्याकरिता कोणत्याही विद्यार्थ्याला महाज्योतीकडून व्यक्तीशः कळवले जाणार नाही. Exam Hall Ticket / Admit Card Download करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींसाठी 07122870120 / 07122870121 या कार्यालयीन क्रमांकावर संपर्क करावा असे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य नागपुर यांच्या वतीने परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
सुधारित विद्यार्थी संख्या
महाज्योतीकडून दिनांक 12 जून 2023 जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थी संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे सुधारित विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
परीक्षा योजना | कालावधी | सुधारित संख्या |
---|---|---|
मिलिटरी भरती | 6 महिने | 750 विद्यार्थी |
UPSC परीक्षा [इंग्रजी] UPSC परीक्षा [मराठी] | 11 महिने 11 महिने | 1000 विद्यार्थी 750 विद्यार्थी |
MPSC परीक्षा | 11 महिने | 1000 विद्यार्थी |
MPSC गट ब&क परीक्षा | 6 महिने | 750 विद्यार्थी |
MBA-CAT/CMAT-CET | 6 महिने | 750 विद्यार्थी |
Mahajyoti Scholarship Scheme
प्रशिक्षण योजना | एकूण शिष्यवृत्ती |
---|---|
Military Bharti training 2023- 24 | 60,000/- |
MBA-CAT/CMAT- CET 2023-24 | 60,000/- |
MPSC (Group B and C) Exam 2023 | 80,000/- |
UPSC (Marathi Medium) Training 2023 24 | 1,10,000/- |
UPSC (English Medium) Training 2023 24 | 1,43,000/- |
MPSC Training 2023-24 | 1,10,000/- |
Conclusion
महाज्योती कडून Competitive Exam ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळालेली आहे, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि विद्यावेतन देऊन स्वत:च्या पायावर थांबण्यासाठी MAHAJYOTI आर्थिक सहाय व शैक्षणिक सहाय्य करत असते. वरीलप्रमाणे विविध योजनाच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि अनुषंगिक माहिती दिली आहे.