कोतवाल भरती 2023: राज्य शासनाच्या वतीने विविध पदावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. दिनांक 17 मे 2023 रोजीच्या शासन परिपत्रक नुसार राज्यातील कोतवाल पदाच्या एकूण रिक्त पदापैकी 80% पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना एक सुवर्णसंधी मिळाली आहे. नुकतीच Mumbai Suburban Kotwal Recruitment 2023 जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार Mumbai Suburban Kotwal Bharti 2023 ची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
![]() |
Kotwal Bharti 2023 |
Kotwal Bharti 2023: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदाच्या २५ जागावर नवीन भरती सुरु, चौथी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
मुंबई उपनगर जिल्ह्यामधील विविध तालुक्यातील कोतवाल पदाच्या 25 जागा रिक्त असून ह्या जागा जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तालुका निवड समितीकडून भरली जाणार आहेत, Mumbai Suburban Kotwal Bharti 2023 अंतर्गत भरल्या जाणारे पदांचे तालुकानिहाय विवरण खालीलप्रमाणे आहे.
तालुकानिहाय कोतवाल रिक्त पदे
अनु | तालुका | रिक्त जागा |
---|---|---|
1 | अंधेरी कोतवाल भरती | 14 |
2 | बोरीवली कोतवाल भरती | 04 |
3 | कुर्ला कोतवाल भरती | 07 |
4 | एकूण | 25 |
वरील रिक्त पदामध्ये समाधीत तालुक्याच्या जाहिरातीनुसार वाढ किंवा घट होऊ शकते.
शैक्षणिक पात्रता Education Qualification for Kotwal Bharti 2023
- उमेदवार किमान चौथी पास असावा .
- उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 40 वर्षे असावे.
- शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
- मराठी भाषा बोलता, लिहता आणि वाचता येणे आवश्यक.
- स्थानिक रहिवासी असावा.
परीक्षा शुल्क Exam Form Fees
- अर्जाचे शुल्क 20/- रुपये
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 700/- शुल्क आकारले जाईल. (जाहिरात पहावी)
- राखीव प्रवर्गातील उमेदवारास 500/- शुल्क आकारले जाईल. (जाहिरात पहावी)
- उपरोक्त शुल्काशिवाय बँक चार्जेस इतर राहतील
- शुल्क ना परतावा असेल.
- शुल्काचा डिमांड ड्राफ्ट तहसीलदार अंधेरी तथा सदस्य सचिव कोतवाल निवड समिती यांचे नावे असावे. चेक जोडलेला किंवा धनाकर्ष [DD] न जोडलेला अर्ज फेटाळला जाईल.
लेखी परीक्षा Written Exam Kotwal Bharti
दिनांक 17 मे 2023 रोजीच्या निर्णयानुसार परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. संबंधित तालुक्याची लेखी परीक्षा निश्चित करण्यात आली आहे. Kotwal Bharti 2023 साठी परीक्षेची दिनांक 06 ऑगस्ट 2023 असून 100 गुणांची लेखी परीक्षा असेल. परीक्षेमध्ये एकूण 50 प्रश्न असून सर्व प्रश्नांना समान गुण असणार आहेत.परीक्षेचे माध्यम मराठी असणार आहे. सदरील पदास मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.परीक्षेच्या अभ्यासक्रमास खालील मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज कसा करावा How To Apply for Kotwal Bharti
Kotwal Recruitment 2023 साठी खालील संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेत, संबंधित तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात भेट देऊन फॉर्म घ्यावे.
कोतवाल भरती आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पुराव्याची सत्यप्रती.
- शाळा सोडल्याचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र
- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- रंगीत पास फोटो
- EWS प्रमाणपत्र
- इतर अनुषंगिक कागदपत्रे
अर्जाचा नमुना व जाहिरात Kotwal Bharti Form & Advertisement
खालील अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात दिली आहे. जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. तो प्रिंट करून पूर्णपणे भरावा आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत.
वेतनमान Pay scale For Kotwal Post
नवीन शासन निर्णयानुसार कोतवाल पदास 15,000 वेतन देण्यात येणार आहे. (शासन निर्णय पाहण्यास इथे क्लिक करा)
अर्जाचा कालावधी
संबधित तालुक्यामध्ये 05 जुलै 2023 पासून ते 17 जुलै 2023 पर्यंत पूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडून सुटीचे दिवस वगळता जमा करू शकता. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.