Mahajyoti Tab: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय [OBC] विमुक्त जाती [VJ A] - भटक्या जमाती [NT] तसेच विशेष मागास [SBC] प्रवर्गातील विद्यार्थ्या कडून Mahajyoti Nagpur च्या वतीने MHT-CET/JEE/NEET-2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले आहेत.
![]() |
Mahajyoti Nagpur |
सुवर्णसंधी !! दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महाज्योती फ्री टॅबलेट योजना, अर्ज करा @Mahajyoti Nagpur
Mahajyoti Nagpur ही शासनाची संस्था असून महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. हे प्रशिक्षण दहावीनंतर देण्यात येते. प्रशिक्षण दोन वर्षासाठी असून तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व 6GB दररोज इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. अर्ज करण्यासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची पद्धती याविषयी संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया.
महाज्योतीकडून विविध योजना राबविल्या जातात. त्यातील दह्वी पास विद्यार्थ्यांसाठी Mahajyoti Free Tablet ही एक सुंदर सरकारी योजना आहे. यासाठी दरवर्षी पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट दिले जातात.
योजनेच्या लाभासाठी पात्रता Eligibility
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
- उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा.
- विद्यार्थी दहावी उत्तीर्ण असावा.
- जे विद्यार्थी सन 2023 मध्ये दहावीची परीक्षा दिली आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा ज्या बाबतची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
महत्वाची सूचना
Important Document महाज्योती योजना - आवश्यक कागदपत्रे
- इयत्ता दहावीची गुणपत्रिका
- उमेदवाराचा आधार कार्ड
- उमेदवाराचा रहिवासी दाखला
- उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र
- उमेदवाराचा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- इयत्ता 11वी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे बोनफाईड
How to Apply Mahajyoti Tab अर्ज कसा भरावा
- Mahajyoti Tab साठी पात्र विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्जासोबत नमूद कागदपत्रे स्वाक्षंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
- अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 जुलै 2023 आहे
- Mahajyoti Nagpur साठीचे अर्ज पोस्टाने किंवा ईमेल द्वारे स्वीकारले जाणार नाही.
- Mahajyoti Tab साठी फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्याकडे राहतील
अधिक माहितीसाठी For More Detail
महज्योती योजना 2023 चा अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ खाली दिलेल्या अधिकृत ई-मेल व फोन नंबर वर संपर्क करावा.संपर्क क्रमांक
0712-2870120
0712-2870121
ईमेल ID
mahajyotijeeneet24@gmail.com