Teacher Prerna Exam 2023: शिक्षकांच्या परीक्षेची तारीख ठरली; या आठ जिल्ह्यात होणार परीक्षा

शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असताना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शिक्षकांची  Teacher Prerna Exam 2023 घेण्याचे निश्चित केले आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोप होत असल्यामुळे Sunil Kendrekar यांनी वेगवेगळ्या विषयावर सर्व्हेक्षण केले आणि त्यानंतर उक्त Shikshak Prerna Pariksha घेण्याचे निश्चित केले आहे. परीक्षेच्या तारखेविषयी आणि अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूपाविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.



Teacher Prerna Exam 2023
Teacher Prerna Exam 2023

Teacher Prerna Exam 2023: शिक्षकांच्या परीक्षेची तारीख ठरली; या आठ जिल्ह्यात होणार परीक्षा 

शिक्षकांच्या परीक्षेची तारीख 

प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शिक्षकांची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दि. 30 जुलै आणि 31 जुलै या दिवशी ही परीक्षा होणार आहे. थेट शिक्षकांची परीक्षा होत असल्याने याकडे पालकांसह विद्यार्थ्याांचे लक्ष लागले आहे. Teacher Prerna Exam 2023

सर्वेक्षणात या बाबी आल्या समोर (Teachers Exam)

शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचा आरोपाची Commissioner Sunil Kendrekar यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सुरुवातीला सर्वेक्षण केले. प्रत्यक्षात शाळेत जाऊन मुलांच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. या पाहणीत अनेक ठिकाणी खूपच वाईट परिस्थिती असल्याचे समोर आले होते. 

लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या 45 टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. विशेष म्हणजे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले.

मराठवाड्यातील सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचं देखील केंद्रकर म्हणाले होते. त्यामुळे थेट शिक्षकांचीच Teacher Prerna Exam 2023 परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने दि. 30 आणि 31 जुलै या दोन दिवशी ही परीक्षा होणार आहे.


महत्वाच्या ठळक बाबी Teacher Prerna Exam

शिक्षक प्रेरणा परीक्षेत विभागातील अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शाळातील शिक्षकांसाठी ही परीक्षा असेल.

संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे.

ही परीक्षा शिक्षकांना विषयज्ञानात पारंगत करून त्यांचे विषय ज्ञान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने घेण्यात येत आहे.

या परीक्षेचा शिक्षकांच्या सेवाविषयक बाबीवर कुठलाही परिणाम होणार नाही.

परीक्षेस बसण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादी केली गेली आहे.

शिक्षक प्रेरणा परीक्षासाठीचा वेळ व दिनांक हा आपल्या विभागात  एकच असेल.




परीक्षेचे नियोजन (Teachers Exam)

  • मराठवाड्यातील शिक्षकांची परीक्षा 30 आणि 31 जुलैला पार पडणार आहे.
  • मराठवाड्यातील 18 हजार शिक्षकांनी परीक्षा देण्याची तयारी दर्शवली आहे.
  • यासाठी प्रत्येक जिल्ह्यात (Teachers Exam) परीक्षा केंद्र असणार आहे.
  • पहिले ते दहावीच्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे.
  • जिल्हा परिषद आणि अनुदानित संस्थांच्या शिक्षकांची ही परीक्षा होणार आहे.

शिक्षक प्रेरणा परीक्षेचे स्वरूप Nature Of Teacher Prerna Exam

  • या परीक्षेत निगेटिव्ह मार्क (Teachers Exam) असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहेत.
  • विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षा घेण्यावर अधिक भर असणार आहे.
  • परीक्षा देणे बंधनकारक नसून इच्छुक शिक्षकांना या परीक्षेत बसता येणार आहे.
  • प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरूपाची 50 गुणांची असेल म्हणजेच प्रत्येक प्रश्नाचे 01 गुण दिला जाणार आहे.
  • शिक्षक प्रेरणा परीक्षासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू असणार आहे 
  • प्रत्येक चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.
  • परीक्षेमध्ये अंतिम गुणाचे आधारे एकूण गुणांपैकी 50 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या शिक्षकास उत्तीर्ण ठरविण्यात येणार आहे.
  • अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुकमे प्रथम येणाऱ्या 50 परिक्षार्थीची नावे, उत्तीर्ण परिक्षार्थींची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषित करण्यात येणार आहे.
  • गुणाानुक्रमे जिल्ह्यातून प्रथम येणाऱ्या 50 परीक्षार्थींना सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

नवीन आयुक्त काय निर्णय घेणार?

शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि गुणवत्तेत सुधारणा व्हावी यासाठी शिक्षकांच्या परीक्षा व्हाव्यात असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे स्वप्न होते. मात्र त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून येत्या 3 जुलैला ते पदभार सोडणार असल्याच्या बातम्या मिळत आहेत. त्यामुळे नवीन येणारे विभागीय आयुक्त शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय कायम ठेवतात की, त्याला ब्रेक लावतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



FAQ

प्रश्न - शिक्षक पेरणा परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यात होणार आहे का?

उत्तर नाही. मराठवाडा विभागात येणाऱ्या सर्व जिल्ह्यात परीक्षा घेतली जाणार आहे.

प्रश्न - शिक्षक प्रेरणा परीक्षा सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे का.

उत्तर  शिक्षक प्रेरणा परीक्षा ऐच्छिक आहे. खाजगी संस्था आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक देऊ शकतात.

प्रश्न - शिक्षक प्रेरणा परीक्षेमुळे सेवाविषयक बाबीवर परिणाम होईल का?

उत्तर Teacher Prerna Exaam मुळे सेवाविषयक बाबींवर परिणाम होणार नाही असे परिपत्रकात सांगितले आहे.

प्रश्न - शिक्षक प्रेरणा परीक्षा कुठे होईल?

उत्तर शिक्षक प्रेरणा परीक्षा जिल्हास्तरावर होणार असून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

प्रश्न - शिक्षक प्रेरणा परीक्षेचे सनियंत्रण कोण करणार?

उत्तर शिक्षक प्रेरणा परीक्षेचे सनियंत्रण जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी करतील.




Please do not entre any Spam Link in the Comment Box

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने